भुसावळ (प्रतीनीधी ) –

तालुक्यातील वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगणार्या दोघांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.
तालुक्यातील वरडसीम येथील पाण्याच्या टाकीजवळ राजेश रमेश तायडे (वय २७, रा.पाडळसे, ह.मु.असोदा), सचिन संतोष सपकाळे (वय २६, रा. वराडसिम) हे गैरकायदा विना परवाना १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा बळगतांना मिळून आले. या प्रकरणी २० रोजी राजू टाक (रा. वाल्मिक नगर भुसावळ )व मयूर कैलास सपकाळे (रा. वराडसीम ता.भुसावळ ) या दोघांना अटक करण्यात आली आहे . या आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे . ही कारवाई डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण व पोलिस पथकाने केली आहे


