भुसावळात धूळ खात पडून असलेल्या व्हेंटीलेटर बाबत आरोग्य मंत्री टोपे यांना निवेदन ; माजी आमदार संतोष चौधरीं यांची तक्रार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या व्हेंटीलेटरचा वापर होत नसले बाबतची तक्रार माजी आमदार संतोष चौधरीं यांनी केली असून याबाबत आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे
यांची प्रत्यक्ष भेट घेवून परिस्थितीची जाणीव करून देवून लेखी तक्रार केली आहे .
भुसावळ शहरात ग्रामिण रुग्णालय जळगांव रोड याठीकाणी नव्याने ट्रॉमा सेंटर सुरु करण्यात येवून
येथे सुमारे १० व्हेंटीलेटर देण्यात आलेले आहेत व आपणास विदित आहेच की भुसावळ शहर हे
जिल्हयातील कोव्हीड विषाणूच्या संसर्गाबाबतीत हॉट स्पॉट
(Hot Spot )असून या ठिकाणी कोविड १९ (Covid-19)
विषाणुने ग्रस्त रुग्णांची संख्याही जास्त असून वाढत आहे. भुसावळ शहर,परीसरातील रेल्वे
हॉस्पीटल, गोदावरी रुग्णालय, या ठिकाणी रुग्णांना व्हेन्टीलेटर मिळत नसले बाबत वारंवार मला
दुरध्वनीवरुन सांगण्यात येवून त्याबाबत तक्रार केली जात आहे .
भुसावळ शहर व ग्रामीण भागात नव्याने रुग्ण आढळत असून अश्या गंभीर परीस्थिती शासनाने पुरविलेले ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा
सेंटर येथील व्हेन्टीलेटर स्थानिक प्रशासनाने वापरात घेतलेले नाहीत. ते आज मितीस बंद खोलीत
वापरा विना पडून आहेत. काळाची गरज पहाता हे स्थानिक प्रशासनाने उपयोगात आणणे गरजेचे आहे. म्हणून यापत्राद्वारे
कोव्हीड-१९ चे काळात सामान्य नागरीकांच्या हीताच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनास आपणाकडून पुरविण्यात आलेल्या १० व्हेंटीलेटर चा वापर सुरु करावा असे आदेश दयावेत, जेणे करुन उदघाटनापासून म्हणजेच
दि. २४ में २०२० या तारखे पासून वापरात न आणलेले व्हेन्टीलेटर रुग्णांना उपलब्ध करता येणे शक्य
होईल . अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजिनदादा पवार ,जिल्हाधिकारी जळगाव यांना सुद्धा देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *