लाच मागणी प्रकरणी चाळीसगाव तहसीलच्या लिपिकासह खाजगी पंटरला अटक ;

जळगाव

शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात 11 हजारांची लाचेची मागणी केल्याचे प्रकरण चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या लिपिक टंकलेखकाच्या अंगलट आले असून खाजगी पटरासह दोघांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत किसन सावकारे (30, रा.पाचोरा) तसेच खाजगी इसम यादव केशव पवार (60, रा.भोजे, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

लाचेची मागणी भोवली
पाचोरा तालुक्यातील 48 वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी प्रकरण दाखल केल्यानंतर काम करण्याच्या मोबदल्यात यातील आरोपी प्रशांत सावकारे व यादव पवार यांनी 17 जुलै 2020 पंचांसमक्ष 11 हजारांची लाच मागितली होती. तेव्हा आरोपी पाचोर्‍यात नोकरीस होता मात्र कालांतराने त्याची चाळीसगाव तहसीलला बदली झाली मात्र लाच मागणीबाबतचा अहवाल जळगाव एसीबीला प्राप्त झाल्याने शुक्रवारी एका आरोपीला चाळीसगावातून तर दुसर्‍याला पाचोरा येथून अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक सुनील शिरसाठ, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *