भुसावळ (प्रतिनिधी )-
दि. १ ते ३१ ऑक्टोबर २०२० असा संपूर्ण महिन्याच्या कालावधीसाठी “ योगासन प्राणायाम वर्ग” कॉसमॉस बँकेच्या
टेरेसवर, गरुड प्लॉट, मामाजी टॉकिज रोड, भुसावळ येथे सकाळी ६ ते ७ या वेळेत
सुरु होत आहे.
या योगवर्गात सुर्यनमस्कार, महत्वाची योगासने, बंध, शुध्दिक्रिया, प्राणयामाचे
प्रकार, हास्यकला इ. प्रक्रिया शिकवून करवून घेतल्या जातील. हा योगवर्ग प्रख्यात योग
तज्ञ प्रा. वसंत बळेल (योग पंडित) हे स्वत: घेणार आहेत. सहाय्यक शिक्षक म्हणून श्री.
किशोर गायकवाड मदत करीत आहेत. या वर्गामध्ये प. पु. स्वामी रामदेवजी महाराज यांचे
प्राणायाम पॅकेज ही शिकवून करवून घेतले जाईल. या योगवर्गात अगोदर योगप्रवेश परीक्षा
उत्तीर्ण साधकांना तसेच सरावासाठी येणाऱ्या सर्व स्त्री पुरुष साधकांना प्रवेश मिळेल.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी – प्रा. वसंत बळेल, प्रसाद पॅलेस, कुळकर्णी
प्लॉट, वकील गल्ली, भुसावळ मो. नं. ९४२२२७६१५० यांच्याशी संपर्क साधावा. किंवा
परस्पर कॉसमॉस बँकेच्या टेरेसवर हजर राहावे असे बँक मॅनेजर श्री. देशमाने यांनी
कळविले आहे.



