डॉ. मंगला वानखेडे यांना पीएचडी पदवी ;


भुसावळ (प्रतिनिधि )-
मुंबई येथील डॉ. मंगला गजानन वानखेडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील
मानव्य विद्याशाखेअंतर्गत मराठी विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील माजी विभागप्रमुख डॉ. दिलीप अलोणे यांच्या
मार्गदर्शनाखाली स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात साठोत्तरी वैदर्भित लेखिकांच्या साहित्याची
चिकिस्ता ‘ या विषयात त्यांनी
संशोधन केले आहे.
विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मौखिक परीक्षा घेतली. त्यावेळी धनाजी नाना
महाविद्यालय , फैजपूर जि.जळगाव येथील मराठी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. मनोहर सुरवाडे बाह्य परीक्षक होते. मार्गदर्शक डॉ. दिलीप अलोणे व विद्यापीठातील सुजय बंड हे उपस्थित होते.
डॉ. मंगला वानखेडे ह्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्या पत्नी आहेत. डॉ. मगला वानखेडे यांनी आयुष्यभर नोकरी न करता गृहिणी म्हणून
कुटुबाची जबाबदारी पार पाडली . सोबतच मराठी साहित्याची आवड जोपासून अभ्यासही त्यांनी केला. एक स्त्री व विदर्भकन्या म्हगून त्यांनी स्त्रीवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर वैदर्भीय
लेखिकांच्या साहिल्याने संशोधन केले आणि वयाच्या ५५ वर्षी पीएच. डी. पदवी प्राप्त केली.
शैक्षणिक क्षेत्रात व विविध समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
तसेच ठाकुर समाजाच्यावतीने संपादीका प्रा.जयश्री साळुंखे,आदीवासी ठाकूर समाज अध्यक्ष गोपाळ ठाकुर(भुसावळ ),तिकीट निरिक्षक मोहन चव्हाण (भुसावल),अमळनेर ठाकूर समाज अध्यक्ष दीलीप ठाकुर,पंकज ठाकुर(नाशिक),डाँ . मनोहर देवरे(औरंगाबाद),ठाकुर महीला समाज अध्यक्ष मिनाबाई बि.ठाकुर(अमळनेर),अपेक्षा पवार,विजय गाढे,सुनिल करंदिकर व उमाकांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *