भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह या कोविड केअर सेंटरला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांनी शुक्रवार २५ रोजी भेट देवून आस्थेने

विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून त्यां सोडविण्याकरीता उपाययोजना बाबत
प्रयत्न करणार असल्याचे
आश्वासन दिले . तसेच कोविड केअर सेंटर मध्ये येणारा प्रत्येक रुग्ण माझ्या घरातील सदस्य आहे ही भावना मनात ठेवून त्यांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात असा माझा प्रयत्न असून भुसावळ मधील कोविड केअर सेंटर व तालुक्यातील कोरोना उपाययोजना यावर माझे लक्ष राहणार आहे तसेच चौधरीं परिवार सदैव आपल्या सेवेत राहिल अशीही ग्वाही सचिन चौधरीं यांनी यावेळी दिली .
यावेळी त्यांचे समवेत लहान बंधू धीरज अनिल चौधरी, युवा नगरसेवक दुर्गेश ठाकूर आदि उपस्थित होते.


