शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची कार्यकारणी जाहीर ;


भुसावळ (प्रतिनिधि ) –

शुक्ल यजुवेदीय ब्राह्मण मंडळाची सर्वसाधारण सभा ‘यजुर्वेद भवन’ येथे नुकतीच गजानन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकाणीची निवड करण्यात आली.सुरुवातीला माजी खा.स्व. हरिभाऊ जावळे, स्व.डॉ. खानापूरकर, स्व.भुषण जोशी, स्व. श्रीपाद चौक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर एकमताने कार्यकारणीची घेषणा करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी गजानन जोशी, उपाध्यक्ष ऍड. सुनील घोलप, सचिव हेमंतकुमार मधुकर जोशी, कोषाध्यक्ष अनिल हिंगवे, सहसचिव ऍड. चित्रा आचार्य, सुनील पाठक. कार्यकारणी सदस्य विजय जोशी, श्रीकांत जोशी, दिलीप राव, रामचंद्र गचके, अरुण सोले, अविनाश पाठक, लता देवळालकर, ऍड. मंजुषा कुलकर्णी, किशोर जोशी, कार्यकारणी सदस्य सुनील जोशी, रवींद्र नाईक, शरद अंभईकर, उमेश जोशी, विकास जोशी, बी. एम कुलकर्णी तर सल्लागारपदी सुरेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. बैठकीचे आभार अनिल हिंगणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *