भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवाड्या निमित्त खाद्य पदार्थाची गुणवत्ततेची तपासणी


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ मंडळामधे स्वच्छता पंधरवाड्यातील ९ वा दिवस ‘स्वच्छ आहार ’  म्हणून पाळण्यात आला.
  मध्य रेल्वेत दि. १६ ते ३० सप्टेंबर २०२०
पर्यंत स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे. स्वच्छता पंधरवड्याचा  9 वा दिवस आज  “स्वच्छ आहार” संकल्पनेनुसार पालन करण्यात आला.  भुसावळ मंडळाच्या  सर्व विभागांतील स्टेशनवर  कोविड -१९ प्रोटोकॉल पाळून रेल्वे कार्यालये, विश्रामगृहे आणि आसपासच्या परिसर सह कामाच्या ठिकाणी गहन स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले. भुसावळ स्टेशन येथे स्टेशन वरील सर्व फ़ूड स्टाल यूनिटचे स्टेशन संचालक जी आर अय्यर ,स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव , मुख्य स्वास्थ निरीशक , मुख्य वाणिज्य निरीक्षक यांच्या निरीक्षणाखाली तपासणी करण्यात आले
.तसेच गाड़ी क्रमांक -09045 डाउन सुरत छपरा विशेष गाड़ी , गाड़ी क्रमांक 06528 अप नई दिल्ली बेंगलूर विशेष गाड़ी  मधे पैंट्री कार मधे निरीक्षण करण्यात आले . तसेच खाद्य पदार्थाची गुणवत्ततेची तपासणी करण्यात आली . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *