भुसावळ (प्रतिनिधीं )-
शहरातील औषध दुकानांची तहसीलदार दीपक धीवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
विशेष म्हणजे भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील औषध दुकानांची तपासणी केली जात असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास संबंधित मेडिकल चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार रोजी ही कारवाई झाली औषध दुकानदार औषधांचा स्टॉक वा काळा बाजार करीत आहे का याची माहिती घेण्यासाठी
शहरातील मेडीकल दुकानांची तपासणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्टॉक रजिष्टर, दुकानातील औषधी मालाची स्थिती तपासली जात आहे.
त्या रुग्णांची आरोग्य विभाग जाणणार माहिती
मेडिकलवर आलेल्या ग्राहकांकडे डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी असल्यानंतर ग्राहकांना औषधी देणे बंधनकार असून त्या शिवाय औषधी दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. सर्दी, ताप, खोकला, अशक्तपणा आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी औषधे घेतल्यानंतर संबंधीत रुग्णांचे नाव, गाव, दिनांकसह एका स्वतंत्र रजिष्टरमध्ये माहिती लिहून ठेवायची असून आरोग्य विभाग त्या विक्रेत्यांकडून नंतर ही माहिती जाणून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



