भुसावळ (प्रतिनिधी )-

रेल प्रशासन द्वारा आवश्यक
साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांचे संचालन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे . ज्या लोकाना किंवा व्यावसायिकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा .
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -शालीमार पार्सल विशेष गाडी
गाडी क्रमांक 00113 डाऊन पार्सल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. 31.12.2020 पर्यंत दररोज 22.35 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी 11.35 वाजता शालीमार येथे पोहोचेल.
गाडी 00114 पार्सल विशेष दि 31.12.2020 पर्यंत दररोज 21.25 वाजता शालीमार येथून सुटेल आणि तिसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 11 वाजता पोहोचेल.
ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाशकुडा, मेचेदा येथे गाडी थांबेल.


