भुसावळ (प्रतिनिधी )- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी लेवा पाटीदार समाजाच्या वतीने “सरदार 151 — एक समाज, एक संकल्प, एक भारत” या राष्ट्रएकता अभियानाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश जयंतीनिमित्त केवळ पारंपरिक कार्यक्रम न घेता सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना प्रत्यक्ष सामाजिक कृतीशी जोडणे हा आहे. अभियानांतर्गत देशभरातील समाजबांधवांनी आपल्या क्षमतेनुसार किमान एक सामाजिक सेवा कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, गरजू विद्यार्थ्यांना मदत, ज्येष्ठ, आरोग्य शिबिर, सरदार पटेलांचे विचार परिसंवाद, आरोग्य शिबिर, अंखड राष्ट्र निर्मिती शपथ , नागरिकांचा सन्मान, नदी-तलाव स्वच्छता, सामाजिक जनजागृती, शेतकऱ्यांना मदत आणि पाठबळ, सर्वधर्म समभाव जनजागृती , एक दीप राष्टीय अंखड तेचा ,अशा विविध उपक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. या अभियानाचे घोषवाक्य आहे— “ *सरदारांनी भारत जोडला; आपण भारत जोडणारे बनूया!”* मोठ्या खर्चाच्या कार्यक्रमांपेक्षा लोकसहभाग, सेवा आणि राष्ट्रएकतेचा संदेश देशभर पोहोचविणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील सर्व लेवा पाटीदार समाज मंडळे, संस्था, युवक, महिला, विद्यार्थी व समाजबांधवांनी या अभियानात सहभागी होऊन “एक समाज — एक भारत”हा संदेश देशभर पोहोचवावा, असे आवाहन लेवा समाजाचे युवा नेते लेवाहित वादी चळवळीचे मुख्य प्रवर्तक शिशिर डी जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे केलेले आहे.


