भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी खुर्दा रोड ते सुरत मार्गावर (अप-डाऊन) विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे या गाड्या आरक्षित असून भुसावळ विभागातून त्या धावणार असल्याने जळगावसह भुसावळातील रेल्वे प्रवाशांची सुरू जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे.
आरक्षित तिकीटानंतर गाडीत मिळणार प्रवेश
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांसाठी खुर्दा रोड ते सुरत दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. ही विशेष गाडी पूर्णपणे आरक्षित असून केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. अप 02827 अप खुर्दा रोड ते सुरत विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान प्रस्थान स्टेशनहुन दर रविवारी 8.40 वाजता सुटल्यानंतर मंगळवावरी सुरत रेल्वे स्थानकावर 3.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02828 सुरत ते खुर्दा रोड विशेष गाडी 29 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान दर मंगलवारी 08.30 वाजता सुटल्यानंतर गुरुवारी खुर्दा रोडला 3.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, कांताबाजी, टिटलागढ, बालनगीर, बारगह रोड, सबलपूर, अंगुल, तालचेर रोड, धेंकनल, भुबनेश्वर या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

मुंबईतील पावसामुळे अनेक गाड्याा धावताय उशिराने
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने अनेक रेल्वे गाड्यांना त्याचा फटका बसल्याने रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. गुरुवारी महानगरी, हावडा मेल आदी गाड्या उशीराने धावल्या. बुधवारीदेखील मेाठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या तर गुरूवारी स महानगरी एक्स्प्रेस दोन तास, मुंबई हावडा मेल सात तास
नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावल्या तसेच जनता एक्स्प्रेस, पाटली पूत्र एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, गोदान एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस या गाड्या दहा ते 15 मिनिटे विलंबाने धावत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.


