माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळा शिक्षक संघटनांची मागणी ;


यावल (प्रतिनिधी) –

लुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज 50 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारचे 22 मुद्द्यांची माहिती भरावयाची आहे आहे यामुळे शिक्षकांचा पूर्णवेळ जाणार असून असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे यामुळे या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्यात यावे अशा प्रकारची मागणी यावल तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ, अखिल प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना शिक्षक, उर्दू प्राथमिक संघटनांच्या वतीने गटविकास अधिकारी निलेश पाटील व गटशिक्षणाधिकारी नवीन शेख यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आलेली आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रामध्ये शिक्षकांचे नियुक्त करावे अशा कोणत्याही प्रकारचा स्पष्ट उल्लेख नाही तसेच जिल्हा परिषद प्राथमिक जळगाव यांच्या आदेशानुसार कोरोना पासून सेवा अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे व शाळेवर अध्ययन अध्यापनाचे काम करण्यावर आदेशित करण्यात आले आहे त्यासह ज्येष्ठ शिक्षकांना व व्याधीग्रस्त शिक्षकांना सर्वेक्षण यातून वगळला पाहिजे असे असताना देखील या ठिकाणी त्यांना सर्वेक्षणात समावेश करून घेतले आहेत त्याचप्रमाणे शिक्षकांना बीपी शुगर अस्थमा यासह विविध आजारी असलेल्या शिक्षकांना देखील समाविष्ट केले आहे यामुळे या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्यात यावे अशा प्रकारची मागणी शिक्षक संघटनांनी केली
निवेदनावर यावल तालुक्यातून प्रमोद कोळी,सचिन धालपे,योगेश इंगळे,गिरीश महाजन, विक्रांत चौधरी, गिरीश सपकाळे, राहुल वाणी, जहांगिर तडवी, अतुल चौधरी, ललित महाजन, इम्तियाज फारुकी, फारुकी जनाब, तोसिफ वलिमिया, रवींद्र पाटील, आशिष बोरोले ,अमोल जावळे, विजय बाविस्कर, संदीप बारी, नितीन साठे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *