खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता झाल्याची खबर महिलेच्या पतीने दिल्यावरुन तालुका पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे .
खंडाळा येथील रहिवासी सुधीर बाजीराव पाटिल वय 34 यांनी खबर दिली की , त्यांची पत्नी सौ सुवर्णा सुधीर पाटिल वय 24 ही मुलगा सुशील सुधीर पाटिल वय 4 वर्ष हे दोघे दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता गावातील मावशी प्रतिभा शरद चौधरीं यांची मुलगी मेघा हिचा साखरपुडा 20 तारखेस
असल्याने मावशी कडे गेलेली होती . दरम्यान दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजता सासरे भगवान रघुनाथ पाटिल हे आले व सुवर्णा आली का म्हणून चौकशी केली व ती कोणालाही काही एक न सांगता साखरपुडया नंतर सुशील यास घेवून निघुन गेली
असल्याचे सांगितले . दरम्यान आम्ही तिचा नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही . म्हणून
याबाबत महिलेचे पती सुधीर पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात आज 22 रोजी दुपारी खबर दिल्यावरुन हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *