भुसावळ (प्रतिनिधी )-
स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत
२० सप्टेंबर रोजी , स्वच्छ स्टेशन तर्फे स्वच्छता पंधरवाड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी १ ते एनएसजी ४ स्थानकां व्यतिरिक्त “स्वच्छ स्टेशन दिवस ” व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली.
तसेच भुसावळ येथे कोचिंग कॉम्प्लेक्स मध्ये सहा.मंडळ यांत्रिक इंजीनिअर शेख असलम जावेद यांच्या नेतृत्वात १५ वृक्ष तथा ४०० फुल झाडे रोपे लावण्यात आली . यावेळी भुसावळ रेल्वे स्थानक व मंडळाच्या इतर स्थानकांवर प्लास्टिकच्या बाटली क्रशर मशीनच्या वापराविषयी प्रवाशांना जागरूक केले गेले.



