भुसावळात राष्ट्रवादी व जनाधारच्या पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन ; चक्क खड्डेमय रस्त्याला वाहिली श्रद्धांजली ;

;भुसावळ (प्रतिनिधी )- –
येथील यावल रोडवर नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या निकृष्ठ डांबरीकरणाच्या कामा संदर्भात आज दिनांक १९ रोजी भुसावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व जनाधार पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सचिन चौधरीं यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करून खड्डेमय रस्त्याला चक्क भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली . तसेच निकृष्ट काम करणाऱ्यां संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे.
भुसावळ शहरातील यावल रोडचे मजबूतीकरण व डांबरीकरण चे काम फेब्रुवारी २०२० मध्ये सुरु होते. त्यावेळेस शहरातील एका सुञ व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन चौधरीं यांचेकडे रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली असता दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी सुद्धा प्रत्यक्षात जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली त्यावेळेस डबर कामावर पिवळी माती पसरविण्याचे बोगस काम सुरू होते. तसेच असलेले हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असल्याने शहरातील काही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी, वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांच्यासमक्ष अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भुसावळ श्री कुरेशी यांच्याकडे या रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची कोणतीही दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही व त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
त्या नंतर लॉकडाऊन च्या काळात या रस्त्यावर कुठलीही वाहतूक नव्हती. या रस्त्याचे डांबरीकरण चे काम जुलै २०२० च्या अखेरीस पूर्ण झाले. परंतु सुमारे दहा दिवसातच या रस्त्यावर भले मोठे मोठे गड्डे पडले. आज या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणे नित्याचीच बाब झालेली आहे. १० दिवसातच रस्ता खराब झाल्याने या रस्त्याचे काम योग्य ती चौकशी व्हावी. यात दोषी संबंधित ठेकेदार बी. एन. अग्रवाल यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच नगरपालिका प्रशासनातील कोणाच्या संगनमताने, दुर्लक्षाने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले याची देखील चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी, पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे.
यावेळी सचिन चौधरीं समवेत नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, अशोक भाऊचौधरी, सचिन अण्णा पाटील, तम्मा पैलवान, निखिल भालेराव, गोकुळ राजपूत, तुषार चौधरी, प्रवीण भंगाळे, सादिक खान, रोहित वानखेडे व सर्व युवक मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *