भुसावळ –
भुसावळातील खडका रोडवरील पुलाखाली अल्तमश रशीद शेख (२१, बाबला हॉटेलजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याची घटना, रविवार १३ रोजी घडली होती. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपी शेख समीर शेख युसूफ वय १९ , शेख शाहरूख शेख युसूफ वय २७ , दोन्ही रा.रींग रोड, भुसावळ) व समीर शेख रहेमान शेख १८, पंधरा बंगला, भुसावळ), शेख आमीर शेख युसूफ (वय १९, रा.पंधरा बंगला) व आदर्श गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा तीन दिवसांची अर्थात २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास डीवायएसपी गजानन राठोड व निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील तपास करीत आहेत.



