भुसावळ –
भुसावळातील डॉ.रवींद्र शुक्ला यांना रोटरी जिल्हा ३०३० च्या वतीने बेस्ट क्लब प्रेसिडेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये हा कार्यक्रम झाला. डॉ.शुक्ला यांना २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट क्लब सेक्रेटरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे शिवाय त्यांच्या ३६६ रोटरी थॉट्स या पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट मोस्ट असामान्य अॅक्टिव्हिटी ऑफ द क्लब हा पुरस्कारही मिळाला आहे. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी हे पुस्तक लिहिले होते. डॉ.शुक्ला यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर रोटरी क्लब परीवारासह मित्र परीवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



