भुसावळ (प्रतिनिधी )-

रेल्वे प्रशासनातर्फे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी क्लोन ४ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे . या गाड़ीत फ़क्त आरक्षित प्रवासी राहतील. या गाड़ीचे अगाऊ आरक्षण अवधी हा १० दिवसांचा असणार आहे. यात भुसावळ विभागातुन खालील गाड्या धावणार आहेत.
गाड़ी क्रमांक ०७३७९ डाऊन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी ही दि.२५ सप्टेंबर पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार रोजी प्रस्थान स्थानकावरून १२-३० वाजता रवाना होईल आणि तिस-या दिवशी ४-२० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहचेल .
या गाडीला भुसावळ विभागातील मनमाड,भुसावळ थांबा असणार आहे.
या गाडीला वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ डबे,४ शयनयान श्रेणी डबे राहतील.
गाड़ी क्रमांक ०७३८० अप हजरत निजामुद्दीन ते वास्को-दि- गामा क्लोन विशेष गाड़ी ही दि.२७ सप्टेंबर पासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून १ वाजता रवाना होइल आणि तिस-या दिवशी ४-४५ वाजता वास्को-दि- गामा येथे पोहचेल .
ही गाडी भुसावळ विभागातील भुसावळ, मनमाड त्यानंतर पुणे , मिरज,बेळगाव,लोंडा,मडगांव येथे थांबे राहतील.यात वातानुकूलित तृतीय श्रेणीचे 12 डबे ,४ शयनयान श्रेणीचे डबे राहतील. गाड़ी क्रमांक ०६५२३ डाऊन यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी दिनांक २३पासून पुढील आदेशा पर्यंत दर बुधवार व शनिवारी प्रस्थान स्थानकावरून १-५५ वाजता रवाना होईल व तिस-या दिवशी १-२० वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. सदर गाडी मनमाड,भुसावळ येथे थांबेल व गाडीत वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ डबे ,४ शयनयान श्रेणीचे डबे राहतील. गाड़ी क्रमांक ०६५२४ अप हजरत निजामुद्दीन – यशवंतपुर क्लोन विशेष गाड़ी ही दि.२६ पासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवार व मंगळवार रोजी प्रस्थान स्थानकावरून ८.४५ वाजता रवाना सुटेल व तिस-या दिवशी ६-२० वाजता यशवंतपुरला पोहचेल.
सदर गाडी भुसावळ,मनमाड , पुणे ,बेळगाव , धारवार ,हुबळी , हावेरी ,दवांगेरे ,अर्सिकेरे,तुमकुरू येथे थांबे घेईल व गाडीत
वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ डबे व ४ शयनयान श्रेणीचे डबे असणार असल्याचे भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले आहे.


