नगरसेवक परिषदेच्‍या जिल्‍हा उपाध्‍यक्षपदी युवराज लोणारी –

भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील व प्रभागातील विविध विकास कामांसाठी नगरपरिषद सभागृहात स्‍वपक्षीय भाजपच्‍या सत्ताधा-यांना जाब विचारणारे माजी उप नगराध्‍यक्ष तथा प्रभारी नगराध्‍यक्ष,नगरसेवक युवराज दगडू लोणारी यांची नगरसेवक परिषद मुंबईच्‍या जळगाव जिल्‍हा उपाध्‍यक्षपदी नियुक्‍ती प्रदेशाध्‍यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी केली आहे. माजी पालकमंत्री तथा विद्‍यमान आमदार संजय सावकारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली युवराज लोणारी हे शहरातील तर कधी प्रभागातील नागरिकांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी दिवसरात्र कार्यरत असतात.आपल्‍या वर्षभराचा उपनगराध्‍यक्षपद व प्रभारी नगराध्‍यक्ष पदाच्‍या काळात त्‍यांनी पहाटे लवकर उठून स्‍वच्‍छता,पाणीपुरवठा,घंटागाड्‍या आदी समस्‍या मार्गी लावल्‍या होत्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *