भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील विविध समस्यांसाठी नगरपरिषद सभागृहात भाजपच्या सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारविरुद्ध आवाज उठवून त्यांचेवर वचक ठेवणारे तत्कालीन जनआधार विकास पार्टीचे गटनेते व विद्यमान राष्ट्रवादी नगरसेवक उल्हास भिमराव पगारे यांची नगरसेवक परिषद मुंबईच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी केली आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास पगारे हे शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आक्रमक शैलीत कार्य करतात.त्यामुळे उल्हास पगारे यांच्यावर अपात्रतेचीही कारवाई करण्यात आली होती व त्यास त्यांना स्थगिती मिळाली होती.तरीही त्यांचा लढाऊ बाणा कायम आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे कृउबा समिती सभापती सचिन चौधरी,राष्ट्रवादीचे गटनेता दुर्गेश ठाकूर,सर्व नगरसेवक व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.



