भुसावळातील शिवभोजन केंद्र संचालक जेष्ठ शिवसैनिक उमाकांत शर्मा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा ; गोरगरीबांना अन्नदान व धान्य वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शिवभोजन केंद्र संचालक व शिवसेना विभाग प्रमुख तथा बाळासाहेबांचे कट्टर कार्यसम्राट जेष्ठ शिवसैनिक
उमाकांत शर्मा (नमा) यांचा वाढदिवस १३ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला .यावेळी गोर गरीब व गरजूंना भोजन (अन्नदान ) वाटप व धान्य वाटप करण्यात आले.
श्रद्धास्थानी असलेल्या स्व. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे २० टक्के राजकारण व ८०टक्के समाजकारण तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकहितार्थ सामाजिक उपक्रम साज़रा करण्यात आला .
वाढदिवसानिमित्त सकाळी स्थानिक जूनी नगरपालिका स्टेशन परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या शिवथाली मध्ये पालक पनीरची भाजी ,सोबत बूंदी व रवा लाड़ू देण्यात आले . तसेच गोर-ग़रीब गरजू लोकांना (तांदूळ व गहू ) धान्य वाटप करण्यात आले .
शिवसेना शाखा लक्ष्मी चौकच्यावतीने आयोजित कार्यक्रमास यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवासेना तालुका प्रमुख हेमंत बऱ्हाटे, युवासेना शहर प्रमुख सूरज पाटिल, माज़ी नगरसेवक दीपक धांडे, अँड निर्मल दायमा,शिवसेना शाखा प्रमुख गौरव शर्मा, सचिव भूषण जोशी आदि शिवसेना पदाधिकारी यांचे हस्ते धान्य वाटप करण्यात आले .
प्रसंगी शिवसेना शाखा लक्ष्मी चौक, शिव मंडळ व शिव प्रतिष्ठानचे पूजन महाजन, यश अग्रवाल, आशीष चौरसिया, ऋषभ अग्रवाल, आदित्य शर्मा, सचिन श्रीनाथ, अजय चौरसिया, दीपू अग्रवाल, यांचेसह शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *