भुसावळचे आमदार संजय सावकारेंं कोरोना पॉझीटिव्ह –


भुसावळ ( प्रतिनिधी) –
भुसावळचे आमदार संजय सावकारे देखील कोरोना पॉझीटिव्ह झाल्याने येथील गोदावरी हॉस्पिटल येथे सोमवारी उपचारार्थ दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार सावकारे यांनी अँन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आला . ते गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. अ‍ॅन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याच्या वृत्ताला आमदार सावकारे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी नागरिकांना आवाहन केले की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी , कोणीही घाबरू नये उपचारांने निश्‍चितपणे आजारावर मात करता येते , असेही ते म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *