भुसावळात वैष्णवीनगर भागात धाडसी घरफोडी ; सात लाखांचा ऐवज लंपास ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा रस्त्यावरील बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी धाडसी घरफोडी करून लाखांचा ऐवज

चोरी करून पोबारा केल्याची घटना आज 14 सोमवार रोजी येथे घडल्याचे
उघडकिस आले .
याबाबत माहिती अशी की प्रतिमा महेंद्र मगरे या 20 मार्च पासून घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्या होत्या. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाल्याने तिकडेच अडकल्या .
आज सोमवार 14 सप्टेंबर रोजी त्या घरी आल्या असता घरातील कुलुपाचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचे दिसून आले .
मगरे यांनी त्वरीत बाजार पेठ पोलीस स्टेशनला संपर्क साधून घडलेला वृतांत सांगितला .
यावरुन घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,प्रभारी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली असता फिर्यादि हीने घरातील सोन्याच्या वस्तू,टी.व्ही.एसी.असा अंदाजे एकूण ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले . दरम्यान मगरे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादिवरुन भाग-५ गुरुन ८३७/२०२० भादवी कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे सह पोना.समाधान पाटील करीत आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण देशात मार्च पासून लॉकडाउन सुरू केल्याने बहुतेक परिवार बाहेर गावी अडकून होते.
या संधीचा चोरांनी चांगलाच फायदा घेतल्याचे अनेक ठिकाणी उघडकिस आले . या दरम्यान चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढले आहे तर शहरात बऱ्याच ठिकाणी कोरोना झालेले रुग्ण उपचार घेत असतांना त्यांचीही घर बंद असल्याचाही फायदा चोर घेत असून अनेक घरामध्ये घरफोड्या करून लाखोवर डल्ला मारत आहे .बहुतेक भाग कटेन्मेन्ट असतात त्यामुळे निर्मनुष्य असलेल्या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *