भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये NEET परीक्षा शांततेत पार ; ५४३ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये पार पडली.
कोरोना विषाणू महामारी असताना देखिल सोशल डिस्टन्स व सावधगीरी पाळून ताप्ती पब्लिक स्कुल च्या प्रिंसीपल निना कटलर व त्यांच्या सहकारी शिक्षीकेंने घेतलेल्या पुढाकारात कोणताही अनुचीत प्रकार न घडता परिक्षा सुरळीत पार पाडली.
सहाशे विदयार्थ्याची व्यवस्था केली.
NEET ची परीक्षेसाठी ताप्ती पब्लिक स्कुल ने सहाशे विदयाथ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. सोशल डिस्टन्स पाळत पन्नास ब्लॉक मध्ये प्रत्येक वर्गात फक्त बारा विदयार्थी बसविण्यात आले होते. सहाशे पैकी पाचशे त्रेचाळीस विदयार्थांनी परिक्षा दिली तर सत्तावन विदयार्थी गैरहजर होते. परीक्षा ही दुपारी दोन ते पाच या वेळात घेण्यात आली. ७२० मार्क्सची परीक्षा होती. जळगांव,धुळे,नंदूरबार जिल्ह्यातील विदयार्थी विदयार्थीनी परीक्षा देण्यासाठी आले होते.
बापूराव बिटे व अरविंद तायडे हे एन टी ए मार्फत ऑफझरवर म्हनून उपस्थित होते.प्रिसीपल नीना कटलर,पेट्रेशिया हॅसेट,सविता सहजे यांनी परीक्षेवर नियंत्रण ठेवून सुरळीत पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *