भुसावळ (प्रतिनिधि )-
शहरातील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत आज सोमवार दिनांक १३ सोमवार रोजी सात कर्मचारी कोरोना सशंयित आढळून आल्याने बँक अधिकारी कर्मचारी व ग्राहकात मोठी खळबळ उडाली आहे .खबरदारी घेण्यासाठी आज सकाळ पासुन बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते .
याबाबतची सविस्तर माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला आहे.बँकेत येणाऱ्या खातेदारांना व्यवहाराविना परतावे लागले.यामुळे ग्राहकांना मात्र चांगलाच त्रास झाला आहे . दरम्यान त्या सात कोरोना बाधित संशयित कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्यांचा अहवाल आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.तसेच बँकेचे व्यवहार कधी सुरू होतील हे मात्र समजु शकले नाही .
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधिताची संख्या वाढत आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री पर्यंत ३८ हजार ८३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे . तर आतापर्यंत हजार ९७१ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे .तर २७हजार ७४९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे . प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी देखील नागरिक शहरात गर्दी करीत असून विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे.



