भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड चौफुलीवर रविवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २० वर्षीय युवकाच्या छातीवर पोटावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी चाक़ूने वार करुन निर्घ्रुण हत्या केल्याची घटना येथे घडली.
खडका चौफुलीवर रविवारी दिनांक १३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मयत अल्तमश शेख रशीद २० राहणार बाबला हॉटेल,कमलाबाई बिल्डींग , या युवकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी चाक़ूने सपासप वार करुन जखमी केले .
दरम्यान जखमीस उपचारासाठी डॉ.मानवतकर दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले . यावेळी डॉ.मानवतकर यांच्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळींची गर्दी झाल्याने काही विपरीत घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आर.सी.पी.पथकांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून दवाखाना परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता.
हा खून नेमका कुणी व कोणत्या उद्देशातून केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. खुनाची माहिती कळताच घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे
सपोनि अनिल मोरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु होती आरोपी फरार झाले असून पोलीस शोघ घेत आहे.



