जळगाव –
भुसावळ शहरातील इराणी मोहल्ल्यातील अल्पवयीन संशयीत चोरट्याकडून डबकी रोड, अकोला पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. संशयीताला ताबा पावती भरून त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार शरीफ काझी, नाईक युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, हवालदार सुरज पाटील, चालक हवालदार इद्रीस खान, राजेंद्र पवार आदींनी ही कारवाई केली. अल्पवयीन संशयीताकडे अकोला पोलिसात भाग ५ सी.आर.नं.२९२/२०२० भादंवि ३७९ मधील पल्सर दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. चोरलेली पल्सर दुचाकी जळगाव गुन्हे शाखेने जप्त केली आहे.



