शिव कॉलनी परीसरात रस्ता काँक्रिटीकरणाला सुरुवात ; नगरसेवक मुकेश पाटील व अनिता सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिव कॉलनी परीसरात ट्रीमीक्स रस्ता काँक्रिटीकरण कामाला शहरातील प्रभाग सातचे नगरसेवक मुकेश पाटील व नगरसेविका अनिता सतीश सपकाळे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने शुक्रवार पासून सुरूवात झाल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकण्याच्या कामामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने सत्ताधारी व पालिका प्रशासनाविषयी नागरीकांमध्ये रोष आहे तर प्रभाग सातमधीत शिवकॉलनी भागात गेल्या दोन दशकांपासून रस्तेच झाले नसल्याने नगरसेवक पाटील यांनी २०१७ पासून सलग तीन वर्ष पाठपुरावा केल्याने रस्त्याला मंजुरी मिळाली होती व आता कामालादेखील सुरूवात झाली आहे.
ट्रीमीक्स पद्धत्तीने रस्त्याचे काम
शिवकॉलनी भागात पाईप लाईन झाल्याने या भागात रस्ते होण्यासाठी नगरसेविक मुकेश पाटील, सतीश सपकाळे व नगरसेविका अनिता सपकाळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेतून रस्ता कामाला मंजुरी मिळून शुक्रवारपासून थेट कामाला सुरवात करण्यात आली आहे. 15 फुट रुंद व 1.25 किमी लांब असा हा ट्रिमिक्स काँक्रीटीकरण होणार आहे. विशेष म्हणजे अमृत पाईप लाईनीतून नळ कनेक्शन देण्याच्या वेळी कोणत्याही प्रकारे रस्त्याचे खोदकाम करावे लागणार नाही, अशी यंत्रणा राबवून हे काम केले जात आहे. रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, सतीश सपकाळे व प्रभागातील नागरीक उपस्थित होते
प्रभागातील काँक्रिटीकरण रस्त्याचे सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेतून काम मंजूर झाल्यानंतर आता ट्रीमीक्स पद्धत्तीने काम केले जात आहे. विस्तारीत भागातील हा पहिलाच रस्ता आहे. दर्जेदार पद्धत्तीच्या कामामुळे या कामाचा शहरात अन्य भागात कामे करताना निश्‍चित उल्लेख होईल, असा विश्‍वास नगरसेवक मुकेश पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *