भुसावळ (प्रतिनिधी )-
वराडसीम येथील
विद्यार्थी, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय
संस्था भारत जळगाव जिल्हा
युवाध्यक्ष लखन सजोले यांच्या
मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी भुसावळसह मुक्ताइनगर, रावेर , जामनेर आदी विविध भागात
ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
भुसावळ तालुक्यात पर्यावरण संघटना भारतचे तालुकाध्यक्ष पवन गणेश बाक्से व
राजुभाऊ राजपुत तसेच
कपिलेश्वर गृप तर्फे २१ वृक्ष लावुन आर एम एस काॅलनी येथे वृक्षारोपन करण्यात आले .
मुक्ताईनगर तालुक्यात वढोदे येथे
वृक्षारोपणासह वृक्ष वाटप
तालुकाध्यक्ष नितीन जोगी यांचे हस्ते करण्यात आले.
तर जामनेर तालुकाध्यक्ष राहुल रॉय , मुळे यांनी केकतनिंभोरा गावात वृक्षारोपण केले. दरम्यान रावेर
तालुकाध्यक्ष प्रकाश जोगी यांनी सुद्धा रावेर तालुक्यात वृक्षारोपण केले.



