भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आयडीबीआय बॅंक शेजारी, सुराणा टाॅवर येथे, श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रचंड कोविड-१९ प्रतिकुल परिस्थीतीत रुग्णसेवेत कार्यरत आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे, त्यांची काळजी घेतली जाते. पण उपचारासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि सोई-सुविधा उपलब्ध नसल्यास पुढील मार्गदर्शन केले जाते.
२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री च्या सुमारास एका महिला रुग्णास तपासले नाहि व रुग्णालयात दाखलहि करुन घेतले नाहि असे वृत्त ,एकतर्फि वृत्त जवाबदारीने न वागु शकणाऱ्या कुठल्यातरी यूट्यूब वृत्त वाहिनीवर प्रसिद्ध झाले. हे वृत्त एकतर्फी तसेच सत्यता न जाणून घेता प्रसिद्ध करण्यात आले, चुकिची माहिती कोणतिही शहानिशा न करता, हेतुपुरस्सर पसरविण्याचा प्रयत्न झालेला असावा. यामुळे अनेक जणांचा गैरसमज झालेला असुन पुढेही होउ शकतो.
नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठीच हे वृत्त प्रसिद्ध केले गेले असावे असे आय एम ए चे मत असुन, डाॅक्टर्स असोसिएशन रिदम रुग्णालयाच्या पाठिशी ठाम पणे उभी आहे.
वारंवार हेतुपुरस्सर रुग्णालयाबद्दल गैरसमज निर्माण होतील असे वृत्त प्रसिद्ध केले जाउ नये या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे पत्रच जिल्हाधिकारी, पोलिस सुपरीटेडंट यांच्या कार्यालयात दिले आहे .
अनेक मान्यवरांनी रुग्णालयास भेट देउन सत्य परिस्थिती जाणून घेतली. कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधीतज्ञांची मदत घेणार आहोत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेउ नये असे आवाहन श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे
करन्यात आले असल्याचे जनसंपर्क अधिकारी,
श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे निलेश वाणी यांनी कळविले आहे .



