खिर्डी – शेतशिवरात काम करत असतांना रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तीचा जागीच मृत्यु झाल्या ची

घटना घडली.येथील रहिवासी आशाबाई राजेंद्र महानुभाव ही शेत कामासाठी स्वतःच्या शेत गट क्रमांक १२९ मध्ये काम करत असताना सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान अचानक वादळीवऱ्यासह विजेच्या कडकडाटीने पावसाला सुरुवात झाली असता सदरहून महिला ही लिंबाच्या झाडाखाली गेली असता तिच्या आंगावर वीज पडल्याने महिला जागीच मृत्युमुखी पडली.घटनेची माहिती परिसरात पसरली असता परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती निंभोरा पोलिसांनी मिळताच घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला असून मयताच्या पार्थिव शरीराला शवविच्छेदन नासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते.तर निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये आकासमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापु पाटील करीत आहे.


