मध्य रेल्वेचे बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) जलद ट्रॅकवर ; मध्य रेल्वेचा मालवाहतूकीसाठी पुढाकार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट स्थापित केले आहेत.  हे व्यवसाय विकास युनिट्स  स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि वैयक्तिक  व्यक्तींकडे नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांची बाजारपेठ आक्रमकपणे तयार करतात आणि त्यांच्या मागण्या एकत्रित करतात.  बिझनेस डेव्हलपमेंट युनिट विविध फ्रेट ॲग्रीगेटर, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था  आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत.  बीडीयूच्या या उपक्रमांमुळे अनेक  नवीन वाहतूक मिळू लागली आणि नव्या व्यवसायासाठी व्यापार आणि उद्योगाशी संबंध सुदृढ झाला.
मध्य रेल्वेने उद्योगाना मालवाहतूक व पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी अखंड व परवडणारी जोड देऊन
अनेक बाबतीत पुढाकार घेतला आहे. यासाठी बरबतपूर, बाळे, रावेर, भिवंडी रोड आणि कसबे-सुकेणे येथे
नवीन गुड्स शेड सुरू केली आहेत आणि अजनी, चिंचवड, मिरज आणि भुसावळ येथे अंतर्गत कंटेनर डेपोचे गुड्स शेड मध्ये रुपांतर केले. याशिवाय मध्य रेल्वेने सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, बेलवंडी, कोपरगाव,
भिवंडी रोड स्टेशन्स पार्सल लोडिंगसाठी सुरू केले आहेत.
जेथे जेथे शक्य असेल तेथे प्रत्यक्ष बैठकां आणि वेबिनारद्वारे विपणन यामुळे प्रथमतःच बांगलादेशात
पाठविण्यासाठी कांदा लोडींग केला गेला; पहिल्यांदाच कन्हाळला खताची नवीन वाहतूक; अजनी ते फुलेरा
आणि बांगलादेश येथे पहिल्यांदाच ऑटोमोबाईलची वाहतूक; प्रथमच कापूस बियाणे भुसावळ राजपुराला लोड
केला गेला , बाळे ते नेलमंगळा पर्यंत रो-रो सेवा ,
 बारामती ते त्रिपुरापर्यंत साखरेचे लोडींग, पॉवर लूम्स आणि
टेक्सटाईल बाय-प्रॉडक्ट्ससाठी भिवंडी प्रसिद्ध आहे. नव्याने विकसित केलेला भिवंडी गुड्स शेड पहिल्यांदाच
वस्त्रोत्पादने पाठविण्यास तयार आहे.
मध्य रेल्वेने टाटाच्या कार बांगलादेशात, महिंद्राची वाहने खडगपूरला, ट्रॅक्टर्स फिरोजपूरला, साखरेची बारामतीहून त्रिपुरा आणि कराडहून तिरुनेलवेलीला वाहतूक केली.  याव्यतिरिक्त, नाशवंत भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीसाठी शेतक-यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या किसान रेल, तसेच  मध्य रेल्वेने बाळे (सोलापूर) येथून रोल ऑन रोल ऑफ (रोरो) वाहतुकीचे काम सुरू केले.  हा सर्व नवीन व्यवसाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये (Divisions) स्थापित व्यवसाय विकास युनिटच्या सखोल विपणनामुळे शक्य झाला.
  पुणे विभागाने चिंचवड गुड्स शेड ते एर्नाकुलम येथे जवळपास ९ वर्षाच्या कालावधीनंतर ऑटोमोबाईल रॅकचे वाहतूक  करण्यात आले, पुण्याहून बांगलादेशात टाटा मोटर्ससाठी ७५ गाड्यांची वाहतूक केली, प्रथमच कराडहून तामिळनाडू येथील  तिरुनेलवेली आणि विलुपुरम येथे साखरेची  वाहतूक केली,  बारामती ते त्रिपुरा येथे देखील साखर  नेण्यात आली, भुसावळ विभागाने महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडच्या वाहनांची वाहतूक नाशिकहून कलैकुंडा, खडगपूर येथे केली.   ओरिएंट सिमेंटसाठी  गंज बसोदा येथे सिमेंटचा मिनी रॅक पाठविले  तसेच भारतीय अन्न महामंडळासाठी खंडवा येथून औरंगाबाद येथे गव्हाची वाहतूक करण्यात आली.   
 लवचिक योजना, कमी दर, वेगवान , सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक आणि अधिक महत्वाचे म्हणजे पर्यावरणास अनुकूल अशा गोष्टींमुळे गुड्स व वस्तूंच्या रेल्वे वाहतुकीसाठी  उद्योग जगत  अधिक स्वारस्यपूर्ण व इच्छुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *