रोझोदा येथे वृध्द दांम्पत्यांची निर्घृण हत्या ;


सावदा –
येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे एका घरात वृध्द दांम्पत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून गाव परिसरात घबराट पसरली आहे.
रोझोदा येथे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, ओंकार पांडुरंग भारंबे वय वर्षे ९० त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे वय वर्षे ८५ हे वृध्द दांम्पत्य राहात होते.
त्यांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पासून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर सहकारी येऊन तेथील नागरिकांना तपासणी करीत असत. या अनुषंगाने गुरुवार १० रोजी सकाळी डॉ हारून काझी तपासणी साठी आले असता, डॉक्टरांना भारंबे दांपत्याच्या घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा डॉक्टरांनीच दरवाजा उघडला असता, घरात वृध्द पती – पत्नी दांपत्यं रक्ताचे थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. डॉक्टरांनी लागलीच सावदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. एपीआय राहुल वाघ यांनी लागलीच सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणले असता श्वानाने शेजारच्या गुरांच्या वाड्यातून फिरून घटनास्थळाचे घराचे गच्चीवरून परत खाली उतरुन मार्ग दाखविला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक ,अप्पर अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी भेट दिली.
दुर्दैवी मयत वृध्द दांम्पत्यांची दोन्ही मुले मुंबई पनवेल येथे नोकरीवर असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली असून, वृध्द दांम्पत्यांची निर्घृण हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्याप समजून आले नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *