भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात गेल्या काही दिवसा पासुन वेगवेगळ्या रोगाचे निदान करण्याचा दावा करून लोंकाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे .याप्रकारामुळे परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील सुभाष जोशी उर्फ स्वामी सुभाषनंदजी ज्योतिष या भोंदू बाबाच्या कारनाम्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी बनावट ग्राहक बनून बाबाच्या दरबारात जाऊन त्याची माहिती घेतली . बाबा लोकांची फसवणूक करीत असल्याचे दिसुन आल्यावर त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली . बाबाला पोलीसी खाक्या दाखवताच मी असा कोणताही रोग बरा करत नाही .पुन्हा असे काही करणार नाही असे बाबानी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या समोर लिहून दिले आहे . अंनिसचे पदाधिकारी
शांताराम जाधव ,अंजना निरभवणे, नरेश वाघ,भगवान निरभवणे , शामकूमार वासनिक, सागर बहिरूणे यांनी भोंदू बाबाच्या या फसवेगीरीचा भांडाफोड करून भोंदू बाबाला चव्हाटयावर आणले .



