रावेर (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील तालुक्यातील चोरवड येथील आरटीओ तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री साडेतीन वाजता आरटीओ अधिकारी अहिरे वाहनाची तपासणी करीत असतानाच बर्हाणपूरकडून रावेरकडे येणार्या ट्रकला थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता रावेरच्या दिशेने पळवल्यानंतर रावेर पोलिसांनी टकचा सिनेस्टाईल पाठलाग करीत ट्रक अडवल्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यात गुरांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे उघड झाले तर अंधाराचा फायदा घेत चालकासह तिघे पसार झाले. या प्रकरणी ट्रक चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २० गुरांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. चार लाखांची गुरे व दहा लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर गुरांच्या वाहतूक पुन्हा उघड झाली आहे.
अवैधरीत्या गुरांची वाहतूक उघड चोरवड नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना गुरांची अवैधरीत्या वाहतूक करणार्या ट्रक चालकाने तपासणी निरीक्षकांना न जुमानता नाक्यावरून भरधाव वेगाने ट्रक रावेरकडे पळवला होता व याबाबत रावेर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर डॉ.आंबेडकर चौकात उपनिरीक्षक अनिस शेख, पोलिस हवालदार सुरवाडे, सुरेश मेढे, योगेश चौधरी व होमगार्ड यांनी सुरक्षा कठडे लावले असता तेथेही या ट्रकचालकाने पोलिसांनाही न जुमानता ट्रकसह पलायन केले व पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर चालकाने ट्रक कच्च्या रस्त्यावर नेल्याने व तेथे ट्रक चिखलात फसला. ट्रक फसल्याचे पाहून चालकासह तिघांनी तेथून पलायन केले. ट्रकमधून कत्तलीसाठी २० (वळू) गुरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले असून ही जनावरे जखमी झाली आहेत. सर्व वळूंना जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.
मध्यरात्री कत्तलीच्या उद्देश्याने मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा व १० लाख रुपये किंमतीचा ट्रक आर.जे.११ जी.ए.७५०१ पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केला असून ४ लाख रुपये किंमतीच्या गरुांची गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे . ट्रक चालक व मालक यांच्या विरुध्द पोलिस सुरेश मेढे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.



