भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी दिनांक 12 सप्टेंबर 2020 पासून चार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर या सर्व गाड्या संपूर्ण आरक्षित असणार आहे . फक्त आरक्षण धारकच या गाडी मध्ये प्रवास करू शकतील. यामध्ये कोरोना संदर्भातील सर्व नियम अटी चे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे. जसे की मास्क , सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स या नियमाचे पालन करावे लागणार आहे .
भुसावळ विभागातून जाणाऱ्या विशेष गाडया ;
भुसावळ विभागातून जाणार विशेष गाडी दिनांक 12 पासून सुरू होणार आहे त्या पुढीलप्रमाणे
1) गाडी क्रमांक 02110 अप मनमाड मुंबई पंचवटी विशेष गाडी ( दररोज) ही प्रस्थान स्टेशन हुन 06.02 वाजता रवाना होईल आणि मुंबई ला 10.45 वाजता पोचेल.
थांबा – लासलगाव, निफाड , नासिक , देवळाली, इगतपुरी
2) गाडी क्रमांक 02109 डाऊन मुंबई मनमाड पंचवटी विशेष गाडी ( दररोज) ही प्रस्थान स्टेशन हुन 18.15 वाजता रवाना होईल आणि मनमाड ला 22.50 वाजता पोहचेल .
थांबा – इगतपुरी,देवळाली, नासिक निफाड, लासलगाव
3) गाडी क्रमांक 02627 डाऊन बेंगलोर नई दिल्ली कर्नाटक विशेष गाडी प्रस्थान स्टेशन हुन 19.15 रवाना होईल आणि तिसरा दिवस ला 10.15 ला नई दिल्ली ला पोचेल . ( दररोज)
थांबा – मनमाड, जळगांव, भुसावळ,बुऱ्हाणपूर, खंडवा
4) गाडी क्रमांक 02628 नई दिल्ली बेंगलोर कर्नाटक विशेष गाडी ( दररोज) प्रस्थान स्टेशन 21.15 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी 13.30 वाजता बेंगलोर ला पोचेल .
थांबा – खंडवा,बुऱ्हाणपूर, भुसावळ , जळगांव, मनमाड
5)गाडी क्रमांक 09051 डाऊन बलसाड मुजफ्फरपुर श्रमिक विशेष गाडी (शनिवारी) प्रस्थान स्टेशन हुन 20.15 ला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी मुजफ्फरपुर होईल
थांबा – जळगांव, भुसावळ ,खंडवा
6) गाडी क्रमांक 09052 अप मुजफ्फरपुर बलसाड श्रमिक विशेष गाडी (सोमवार) प्रस्थान स्टेशन हुन 19.30 वाजता रवाना होईल आणि तिसरा दिवस ला 05.05 वाजता बलसाड ला पोचेल .
थांबा- खंडवा , भुसावळ , जळगांव
7) गाडी क्रमांक 08406 डाउन अहमदाबाद पुरी विशेष गाडी ( शुक्रवारी) ही प्रस्थान स्टेशन हुन 18.40 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी 08.10 वाजता पुरी ला पोचेल.
थांबा – जळगांव, भुसावळ , मलकापूर, अकोला , बडनेरा
8) गाडी क्रमांक 08405 अप पुरी अहमदाबाद विशेष गाडी(बुधवार) हि गाडी प्रस्थान स्टेशन हुन 18.20 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी 07.30 वाजता अहमदाबाद ला पोचेल .
थांबा – बडनेरा , अकोला, मलकापूर, भुसावळ , जळगांव.
ही माहीती रेल्वे सुत्रांनी दिली आहे .



