चोरीच्या दुचाकींसह भुसावळातील दोघे एलसीबीच्या ताब्यात ;


जळगाव –
जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला दुचाकी चोरीच्या दाखल गुन्हयातील दुचाकींसह दोघा दुचाकीचोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत भुसावळ शहरातून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
पो.नि. बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शरीफ काझी, पो.हे.कॉ. सुरज पाटील, पो.हे.कॉ. राजेंद्र पवार, पो.ना. इद्रीस खान, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पो.काँ. रणजित जाधव यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भुसावळ शहरातील आरोपी रोलँड मथ्यास व स्वप्नील सोनवणे रेल्वे फिल्टर हाऊस भुसावळ या दोघांना त्यांच्या ताब्यातील चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली.
त्यांच्या ताब्यातून बजाज विक्रांत व यामाहा मोपेड या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या दुचाकी चोरीप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. .290/2020 भा.द.वि. 380 नुसार गुन्हा दाखल होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *