प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने २० डंपर टाकला मुरुम ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत वाट लागलेल्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी प्रभाग २४ मधील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने २० डंपर मुरूम टाकला .
शहरात अतिशय संथ गतीने अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. संपूर्ण रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखलमय रस्ते झाल्यामुळे पाय ठेवणे देखील कठीण झाले आहे. साहजिकच याचा रोष नगरसेवकांवर प्रभागातील नागरिक काढत आहे.
प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली २० डंपर मुरूम प्रभागातील नारायणनगर, महेशनगर, हिरानगर, कलानगर, तुकारामनगर याठिकाणी टाकला. संपूर्ण प्रभाग खड्डेमुक्त व चिखलमुक्त करण्यासाठी ३० डंपर अजून टाकण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवर तरी मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *