कसबे सुकेणे स्थानका वरून बांगलादेश येथे कांदा रवाना ; गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सुरु ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
नाशिक जिल्यातील कांदा हा बांगलादेशात पाठविण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक वेळेत कसबे सुकेणे येथे गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सहित सुरू करण्यात आले.
मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागा मधील व्यवसाय विकास युनिट ला आणखी एक यश प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांाच्या मागणीनुसार कसबे सुकेणे येथे गुड्स शेड चा विकास परिसंचारी क्षेत्र सहित आठवड्या भरात युद्धपातळीवर करण्यात आला आले. 42 वॅगनचा पहिला रॅक दिनांक 28.8.2020 रोजी कसबे सुकेणे स्थानका वरून बांगलादेश च्या दर्शना या स्थानका साठी रवाना करण्यात आला.
कसबे सुकेणे येथे नवीन गुड्स शेड बनल्या मुळे शेतकरी व व्यापाऱयांना त्यांचे उत्पादन भारतात विक्री करण्यात मदत होईल व निर्यात ही करता येईल.
मध्य रेल्वेने आतापर्यंत बांगलादेशसाठी कांद्याचे 71 रॅक रवाना करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची सेवा ही राष्ट्र सेवा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *