भुसावळ प्रतिनिधि –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात २९ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता मंडळ क्रीडा संघटन मध्य रेल्वे, भुसावळ मंडळ द्वारे “राष्ट्रीय क्रीडा दिवस” साजरा करण्यात आला.
भुसावळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
सायकल रॅली रेल्वे मैदाना वरून याची सुरुवात करण्यात आली असून पुढे डी.आर.एम.कार्यालय, अधिकारी कॉलनी, रेल्वे शाळा रोड, रेल्वे व्यायामशाळे कडून रेल्वे मैदानावर समारोप करण्यात आला या कार्याक्रमात सहभागी झालेले अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडळ इंजिनियर (समन्वय ) राजेश चिखले, वरि संरक्षा अधिकारी एन. के. अग्रवाल, वरि.मंडळ वित्त प्रबंधक चंद्रकांत कदम व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



