व्यापाऱ्यांची होणारी कोरोना तपासणी सक्तीची नसावी – नितिन धांडे यांची मागणी ; प्रांताना निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात प्रांताधिकारी यांचे आदेशानव्ये
सर्व व्यवसायीकांची महामारी कोरोना तपासणी हि सक्तीची करण्यात आलेली आहे. ही तपासणी सक्तीची करु नये अशी मागणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नितिन धांडे यांनी केली असून याबाबत भुसावळ प्रांताधिकारी यांना सोमवार २४ ऑगष्ट रोजी निवेदन देण्यात आले आहेत .
शहरात प्रांत कार्यालयातुन दिनांक २० ते २८ ऑगष्ट २०२० पर्यंत सर्व व्यवसायीकांना महामारी कोरोना तपासणी हि सक्तीची करण्यात आलेली आहे. ही तपासणी म्युनिसीपल हायस्कुल , भुसावळ येथे होत आहे. या तपासणी करीता दररोज २०० लोक येत आहे. परंतु प्रत्यक्षात १०० लोकांचीच तपासणी होत असल्याने बाकी राहीलेले १०० लोकांना परत तपासणी न करता परत जावे लागत आहे. या तपासणी करीता नाहक गर्दी होत असुन त्यामुळे कोरोना
पसरण्याचा जास्त संभावना निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे व्यवसायीकांना सुध्दा आपले काम बंद करून
तपासणी करीता थांबल्यावर सुध्दा काही व्यवसायीकांना विना तापणी करता परत जावे लागत आहे.याकरीता कोरोना तपासणी ही सक्तीची न करता फक्त ज्या लोकांना त्रास आहे व ज्या व्यवसायीकांमध्ये
लक्षण दिसत आहे त्याच व्यवसायीकांची तपासणी करण्यात यावी. जेणे करून गर्दी होणार नाही व कोरोना
पसरण्याचा संभावना कमी राहील. याकरीता उपविभागीय अधिकारी यांनी कोरोना तपासणीची सक्ती करु नये अशीही मागणी नितीन धांडे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *