भुसावळ (प्रतिनिधि )-
इनरव्हील क्लब भुसावळतर्फे ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त मधुरांगण ओल्ड ऐज केअर सेंटरमध्ये टीव्ही संच सेट, दहा बेड आणि दहा गाद्या व सोलापुरी चादर साड्या आणि फळांचे वितरण करण्यात आले. इनरव्हील क्लबचा डिस्ट्रिक्ट 303 च्या पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्नकांत आग्रवाल व सोबत ब्रिजमोहन अग्रवाल यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक संघ भुसावळच्या गोपाळ तिवारी, पद्मजा तिवारी, राधेश्याम लाहोटी व वीणा लाहोटी, गजानन ठाकूर सर, ज्येष्ठ नागरीक नागरीक संघाचे अध्यक्ष आप्पा, व इतर 10 सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक हे आमचे आधारवड आहेत, आम्हाला योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडूनच मिळते, त्यांचा सन्मान करणे हे आमचे परम कर्तव्य आहे, असे मनोगत इनरव्हील क्लब अध्यक्षा शीतल भराडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता राजेश जोशी कांचंन जोशी, खुशाल जोशी, मेघा जोशी यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमात डॉक्टर रश्मी शर्मा, राणी छाबडा, वीणा लाहोटी, शशी लाहोटी कांचन जोशी, मेघा जोशी उपस्थित होत्या.



