भुसावळ (प्रतिनिधी)-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वे भुसावळ विभागामध्ये दिनांक 10 ऑगष्ट पासून दिनांक 16 ऑगष्ट दरम्यान स्वछता अभियान राबवले जाणार आहे . हे अभियान मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन नुसार राबवले जाणार आहे . भुसावळ विभागातील सर्व स्टेशन , बाहेरील परिसर , स्टेशन कार्यालय , ट्रॅक ( विशेष लक्ष ) दिले जाणार आहे . सामान्य नागरिक मधे रेल्वे स्थानक / आणि ट्रॅक स्वच्छ ठेवण्याचे आवाहन व जनजागृति मोहीम द्वारे केले जाईल .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटाझर व सामाजिक अंतर आदीं नियम पाळून
हे अभियान राबवले जाणार आहे .



