भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १२ लकीया नगर शेजारील झोपडपट्टीतील नागरीकांना अवाजवी आलेले लाईट बिल सुधारणा करून मिळावेत यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुसावळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने भुसावळ शहराध्यक्ष तथा माजी नगर सेविका सौ. नंदा निकम यांनी दिले.
निवेदनात नमूद आहे की लकीभा नगर शेजारील नागरीकांना मागच्या महिन्यांपासून चुकीचे लाईट बिल देण्यात आले आहे. कोरोना मुळे नागरीकांच्या हाताला काम नाही . यात हे अवाजवी बिल आल्याने नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या वाढीव बिलात सुधारणा करण्यात यावी.
याबाबत त्वरीत न्याय न मिळाल्यास विद्युत अभियंता यांना घेराव घालण्यात येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी नगर सेविका सौ. नंदा निकम यांनी दिला.
प्रसंगी प्रकाश निकम यांचेसह रॉ का महिला आघाड़ी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या .



