माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात – डॉ. संतोष बोराडे


भुसावळ (प्रतिनिधी )-
संगीताचे नानाविध प्रकार आहेत बालपणापासून तर मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीताचे 1 केले आहे आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम असून मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास आपल्यावरती आलेला ताणतणाव निश्चितपणे दूर करता येऊ शकतो व माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ. संतोष बोराडे यांनी केले

रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ आयोजित द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प ऑनलाइन गुंफण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर म्हणाले की शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व वेगळ्या विचारांची मेजवानी शिक्षक पालक व विद्यार्थी यांना देण्याच्या दृष्टिकोनातून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी त्यांना कुठेतरी मनोरंजन व्हावे वेगळी मेजवानी मिळावी हे उद्दिष्ट असल्याचे सांगत रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे सदस्य जीवन महाजन यांनी डॉ. संतोष बोराडे यांनी संगीतातून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली
डॉ. बोराडे पुढे म्हणाले की आपली प्रकृती सुदृढ असताना संगीत ऐकणे गरजेचे आहे यामुळे आपली प्रबोधन अध्यात्मिक शक्ती वाढते स्वतःमधील गुण विकसित करता येतात प्रत्यक्ष तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी केली पाहिजे विद्यार्थी चांगला माणूस म्हणून तयार होण्याची क्षमता संगीतामध्ये आहे संगीत ऐकताना आपण काय ऐकले पाहिजे याचा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे वाद्य वाजवणे म्हणजे संगीत नाही आईचे अंगाई गीत आपण म्हटलेली कविता आपल्याला आवडली हे गाणे पारंपारिक लोकगीते हेसुद्धा संगीतच आहे आपल्या आयुष्यातील संगीत आपण शोधले पाहिजे संगीतामधून माणसाला चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते तो घाबरून न जाता त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो संगीतामधून विष व अमृत दोन्ही तयार होते पण आपल्याला काय घ्यायचे हे आपल्यावर ती अवलंबून असते गर्भावस्थेत पासून आपण संगीत ऐकू शकतो संगीत म्हणजे नुसते वाद्य नसून पारंपारिक गीते सुद्धा यांचा समावेश होतो
आपल्या अंगी असलेल्या भावभावनांना आळाफाटा देऊ नका रडावेसे वाटले रडा, हसावेसे वाटले तर हसा, राग व्यक्त करावासा वाटला तर राग व्यक्त करा आईच्या अंगाई गीतांमधून आई-वडिलांच्या स्नेह प्रेमातून आपल्या शरीरामध्ये विविध विकार श्रवतात आणि ती आपल्या शर्यती उपयुक्त असतात यामुळे कोणत्याही भावनांना न दाता आणि व्यक्त करण्याची सवय लावा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार योगेश इंगळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ सांगली चे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे प्रोजेक्ट वॉटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *