डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे तर्फे राज्यस्तरीय फोटो निबंध स्पर्धाचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे तर्फे इयत्ता १०, ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “राज्यस्तरीय फोटो निबंध स्पर्धा” घेण्यात येणार आहे. “स्थानिक उपलब्ध सामग्रीचा वापर करून बनवण्यात आलेला निवारा म्हणजे शेल्टर्स” असा विषय या स्पर्धेचा आहे. विद्यापीठाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.
यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपास असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून आपण जीवन कसे जगू शकतो? किंवा आपण त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करू शकतो? याचा उपयोग रोजगारात किंवा आपली उपजीविका भागवू शकतो? यावर काम करण्यास मिळेल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदला रामशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे निमंत्रक डॉ. दर्शना देसाई, डॉ. राहुल बारजिभे, डॉ. नरेंद्र काटीकर, डॉ. निलेश पाटील डॉ. एच. एस. जोशी, डॉ प्रमोद देवरे परिश्रम घेत आहेत. आर्किटेक्चर व डिझाईन क्षेत्रातील तज्ञ मान्यवर विद्यार्थ्यांच्या फोटो निबंधांचे मुल्यांकन करतील.
छायाचित्र निबंध विद्यार्थ्यांनी 12 ऑगस्ट 2020 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (http://dbatu.ac.in/pecanb/) माध्यमातून 10 एमबी साईझ पीडीएफ स्वरूपात पाठवायचे आहे. फोटो निबंध इंग्रजी, मराठी किंवा हिंदी भाषेत सादर करता येतील. स्पर्धेचा निकाल 15 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. विजेत्यांना प्रथम बक्षीस सात हजार रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये, तृतीय बक्षीस तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दीड हजार रुपये दिले जाणार आहे. तांत्रिक कौशल्यासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल अशी माहिती कुलगुरू डॉ. वेदला रामशास्त्री यांनी दिली आहे.
शालेय जीवनातच आत्मनिर्भर बना: डॉ.राहुल बारजिभे
संकटाला संधी मध्ये रूपांतर करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आत्मनिर्भर बनवण्याचे कौशल्य प्राप्त करावे म्हणून स्पर्धेत जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव मिळवून द्यावा असे आव्हान विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ.राहुल बारजिभे यांनी केलेले आहे.
टिप – छायाचित्र निबंध सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 10 च्या ऐवजी 12 तारिख करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *