भुसावळ (प्रतिनिधि )-
कोरोना पार्श्वभुमीवर तंबाखू व गुटखा बंदी असतांना सुद्धा
तालुक्यातील साकेगाव येथे चोरुन गुटखा विक्री करणाऱ्या एका विरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे .
पिंटू जगन भोई वय 23 हा साकेगाव येथील स्वतःचे पिंटू पान सेंटरचे बाजूला मोटारसायकलीवर सार्वजनिक जागी स्वतःच्या फायद्याकरिता महाराष्ट्र शासनाची बंदी घातलेल्या विमल गुटखा व सुगंधी सुपारी ,पानसुपारी मसाला, गैरकायदयाने कब्ज्यात बाळगून चोरटी विक्री करीत असतांना आढळून आला त्याचेजवळ गुटखा 31,653 रुपये व मोटारसायकल सह किंमत 66, 653 रु मुद्देमाल मिळून आला . म्हणून भादवी कलम 328 ,188, 272, 273, अन्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि अमोल पवार ,पोलिस अंमलदार विजय पोहेकर ,संजय मोंढे,विठ्ठल फुसे,जगदीश भोई यांनी केली आहे.



