बनावट चेक देऊन फसवणूक करणारा आरोपी अटक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आर.एम.एस.कॉलनी शिरपूर कन्हाळा रोड भागातील रहिवाशी फिरोज सिकंदर तडवी या इसमाने मयताच्या नावावर असलेला इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यासाठी पैसे घेऊन बनावट चेक तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
फिर्यादी कनिस बी.रज्जाक मणियार वय ४० मुस्लिम कॉलनी भागातील महिलेचा पती मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेले एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्सचा पॉलिसी २९ लाखांचा क्लेम मंजूर करून देण्यासाठी ९ लाख घेऊन प्रत्यक्षात कोणताही क्लेम मंजूर करून न देता फसवणूक केली तसेच फिर्यादिस २९ लाखांचा बनावट चेक देऊन फसवणूक केली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन २२/२०१८ भा.द.वि.कलम ४२०,४६७,४६८,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल असून दिनांक ३१ जुलै २०२० रोजी आरोपीस अटक करण्यात आली असून चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपीने भुसावळ शहरातील काही लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन अनेकांची फसवणूक केली बाबत चौकशी करण्यात येत असून फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे व पोना किशोर महाजन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *