भुसावळ येथील २ रेल्‍वे अधिका-यांच्‍या बदल्‍या


भुसावळ(प्रतिनिधौ )-
मध्‍य रेल्‍वेतील मुंबई,पुणे व भुसावळ येथे कार्यरत वरिष्‍ठ रेल्‍वे अधिका-यांच्‍या रेल्‍वे प्रशासनाने बदल्‍या केल्‍या असून त्‍यात भुसावळ येथील २ रेल्‍वे अधिका-यांचा समावेश आहे. आज दि.२८ जुलै मंगळवार रोजी या बदल्‍यांचे आदेश वरिष्‍ठ कार्मिक अधिकारी(राजपत्रित)विपीन कुमार यांच्‍या स्‍वाक्षरीने प्राप्‍त झाले आहे. यात भुसावळ येथे वरिष्‍ठ विभागीय परिचालन व्‍यवस्‍थापक स्‍वप्‍नील नीला यांची बदली त्‍याच जागेवर पुणे,मुंबई मुख्‍यालयातील वरिष्‍ठ वाहतुक व्‍यवस्‍थापक युवराज पाटील यांची भुसावळ येथील वरिष्‍ठ विभागीय वाणिज्‍य व्‍यवस्‍थापकपदी आर.के.शर्मा यांच्‍या बदलीने रिक्‍त होत असलेल्‍या जागेवर,भुसावळ येथील वरिष्‍ठ विभागीय वाणिज्‍य व्‍यवस्‍थापक आर.के.शर्मा यांची वरिष्‍ठ विभागीय परिचालन व्‍यवस्‍थापकपदी स्‍वप्‍निल नीला यांच्‍या बदलीने रिक्‍त झालेल्‍या जागेवर तर विभागीय वाणिज्‍य व्‍यवस्‍थापक(पी.ए)एस.सी.जैन यांना उप मुख्‍य परिचालन व्‍यवस्‍थापक(सर्व्‍हे)मुख्‍यालय मुंबई येथे पदस्‍थ करण्‍यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *